मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

डोमलगाव · अंबड · जालना

स्थान - T:अंबड D:जालना

स्थान क्र. 1 आसन डोमलगाव

आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोमलगाव, पैठण-शहागड मार्गावरील डोमलगाव फाट्यापासून दक्षिणेस एक कि.मी. आहे. पैठण ते डोमलगाव फाटा ३५ कि.मी. शहागड ते डोमलगाव फाटा ६ कि.मी. साठीपिंपळगावहून आग्नेयेस डोमलगाव ४ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान डोमलगावच्या आग्नेयेस गावालगतच सौंदडीच्या झाडजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे काटेरी झाड होते. त्या झाडाखालील हे स्थान होय. स्थानालगतच महानुभाव आश्रम आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: अंबड | Distt: जालना
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात गांधारीहून डोमलगावला आले. त्यांना येथे आसन झाले. चरणक्षाळण, गुळळा (चूळ भरणे ), विडा झाला. मग ते येथून साष्टीपिंपळगावला गेले. (पू. ली. ५२९, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने