मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

शहागड · अंबड · जालना

स्थान - T:अंबड D:जालना

स्थान क्र. 1 वस्ती शहागड

वस्ती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
शहागड हे गाव, मलकापूर-सोलापूर राज्यमार्गावर गेवराईहून उत्तरेस १२ कि.मी. आहे व अंबडहून दक्षिणेस ३० कि.मी. आहे. १) जालना ते शहागड ५९ कि.मी. २) संभाजीनगर ते शहागड ८४ कि.मी. ३) बीड ते शहागड ४४ कि.मी. ४) पैठण ते शहागड ४१ कि.मी. ५) गांधारी ते शहागड ५ कि.मी. गांधारीहून पूर्वेस शहागड पायमार्गे १ कि.मी. आहे. शहागडला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान शहागड गावाच्या पश्चिमेस गावालगतच किल्ह्यामध्ये गोदावरी नदीच्या उत्तर काठी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पानेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकाच्या नैऋत्य विभागीचे हे स्थान होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: अंबड | Distt: जालना
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात खामगावहून शहागडला आले. प्रथम तायेश्वराच्या देवळाच्या चौकात त्यांना थोडा वेळ आसन झाले. त्यानंतर सर्वज्ञ येथे आले. या ठिकाणी त्यांना आसन झाले. बाइसांनी पूजावसर केला. सर्वज्ञांना व्याख्या करण्याची इच्छा नव्हती. मग येथेच पहुड झाला. (पू. ली. ५२७, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून गांधारीला गेले.

जवळील इतर स्थाने