स्थान - T:अंबड D:जालना
स्थान क्र. 1
वसती
साडेगाव
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
पांढरीहून ईशान्येस साडेगाव पायमार्गे ३ कि.मी. आहे. मात्र जोगलादेवी येथे उच्च पाणी साठवण बंधारा झालेला आहे. जर उन्हाळ्यात बंधाऱ्यात पाणी नसेल तरच पायमार्गाने जाता येते. साडेगावला जाण्यासाठी तीर्थपुरीहून वाहनमार्ग आहे. तीर्थपुरी ते साडेगाव ८ कि.मी. आहे अथवा भोगलगाव, जोगलादेवी बंधारा, जोगलादेवी फाटा मार्गे साडेगावला जाता येते. हे अंतर १५ कि.मी. आहे. साडेगावला जाण्यासाठी अंबडहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान साडेगावच्या नैऋत्येस अंदाजे २०१ मीटर अंतरावर गोदावरी नदीच्या उत्तर काठी भ्रमणध्वनीच्या मनोऱ्याजवळ उंचवट्यावर उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे मैराळाचे देऊळ होते. त्या देवळाच्या पटीशाळेवरील हे स्थान होय.
स्थान Images
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
१) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात जोगलादेवीहून साडेगावला आले. प्रथम त्यांना या ठिकाणी उत्तराभिमुख आसन झाले. येथे गौराइसा, आबाइसा, उमाइसा यांची भेट झाली. आबाइसाने सर्वज्ञांना उपहाराची विनंती केली. संध्याकाळी उपहार घेऊन आली. मग पूजावसर झाला. सर्वज्ञांनी प्राशली केली. नंतर येथेच पहुड झाला. (पू. ली. ५०६, स्था. पो.) २) राणाइसाला स्वातंत्रीए धर्म निरूपणे. (पू. ली. ५०७) दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर सर्वज्ञ येथून पांढरीला गेले.