स्थान - T:अंबड D:जालना
स्थान क्र. 1
आसन
ढाकेफळ
आसन स्थान (अहिरमल)
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
ढाकेफळ हे गाव, अंबड-पाशी मार्गावरील घनसांगवी गावापासून किंचित ईशान्येस ७ कि.मी. आहे. १) अंबड ते घनसांगवी २५ कि.मी. २) जालना ते घनसांगवी गुरुपिंपरी मार्गे५० कि.मी. व अंबडमार्गे ५४ कि.मी. ढाकेफळ येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. ढाकेफळपर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. रामसगावहून तीर्थपुरी, घनसांगवी मार्गे ढाकेफळला जाण्यास मार्ग आहे. हे अंतर २९ कि.मी. आहे. रामसगावहून ईशान्येस ढाकेफळ पायमार्गे (खालापुरी, बोडखा बु., मच्छिद्रचिंचोली मार्गे) २२ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान ढाकेफळ गावाच्या किंचित ईशान्येस २ कि.मी. अंतरावर अहिरमल नावाच्या डोंगरावर पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात करडगावहून अहिरमलला आले. त्यांना येथे थोडा वेळ आसन झाले. मग ते येथून ढाकेफळला गेले. (पू.ली. ४८८, स्था.पो.)