स्थान - T:अंबड D:जालना
स्थान क्र. 2
वसती
ढाकेफळ
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
ढाकेफळ हे गाव, अंबड-पाशी मार्गावरील घनसांगवी गावापासून किंचित ईशान्येस ७ कि.मी. आहे. १) अंबड ते घनसांगवी २५ कि.मी. २) जालना ते घनसांगवी गुरुपिंपरी मार्गे५० कि.मी. व अंबडमार्गे ५४ कि.मी. ढाकेफळ येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. ढाकेफळपर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. रामसगावहून तीर्थपुरी, घनसांगवी मार्गे ढाकेफळला जाण्यास मार्ग आहे. हे अंतर २९ कि.मी. आहे. रामसगावहून ईशान्येस ढाकेफळ पायमार्गे (खालापुरी, बोडखा बु., मच्छिद्रचिंचोली मार्गे) २२ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान ढाकेफळ गावाच्या वायव्य विभागी महानुभाव मठाजवळ, विहिरीच्या काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू अहिरमलहून ढाकेफळला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. ४८९, स्था.पो.)