मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

गोपाळचावडी (लिंबगाव) · नांदेड · नांदेड

स्थान - T:नांदेड D:नांदेड

स्थान क्र. 1 आरोगणा गोपाळचावडी (लिंबगाव)

आरोगणा स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
गोपाळचावडी हे ठिकाण, पूर्णा-नांदेड मार्गावरील गोपाळचावडी थांब्यापासून दक्षिणेस अंदाजे ६०३ मीटर आहे. पूर्णाहून पूर्वेस गोपाळचावडी १७ कि.मी. आहे व नांदेडहून पश्चिमेस १७ कि.मी. आहे. परभणी ते गोपाळचावडी ४७ कि.मी. मनमाड-हैदराबाद लोहमार्गावरील लिंबगाव रेल्वे स्थानकापासून नैऋत्येस ३ कि.मी. अंतरावर गोपाळचावडी हे ठिकाण आहे. ढाकेफळहून रांजणी रेल्वेस्थानकामार्गे लिंबगावला जाता येते. ढाकेफळ ते रांजणी रेल्वेस्थानक १४ कि.मी. आहे. गोपाळचावडी येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तसेच नांदेडहून लिंबगावला सिटी बस सेवा उपलब्ध आहे. गोपाळचावडी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान उत्तराभिमुख देवळात आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: नांदेड | Distt: नांदेड
लिंबगाव, नाळेश्वर, कलमुला, पिंपळा या चार गावांच्या सीमांचे हे ठिकाण. येथे पाण्याचीही सोय असल्याने चारी गावचे गोपाळ या ठिकाणी गाई-गुरे चारावयासाठी घेऊन येत असत. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एकांकामध्ये या मार्गाने जात होते. त्या वेळी येथे गोपाळ रानभेरीचा खेळ खेळत होते. सर्वज्ञ गोपाळांना म्हणाले, "आम्ही आपल्यामध्ये खेळण्यास यावे काय?" गोपाळ म्हणाले, "यावे जी" मग सर्वज्ञ गोपाळांच्यामध्ये रानभेरीचा खेळ खेळू लागले. ज्या गोपाळांच्या पाठीवर सर्वज्ञ बसायचे, त्या गोपाळास सुखानंद मिळत असे. अशा प्रकारे सर्व गोपाळांच्या पाठीवर सर्वज्ञ बसले. सर्वांना सुखानंद दिला. मग गोपाळांनी आपल्या शिदोरी सोडल्या. त्यातील चांगले चांगले पदार्थ निवडले, सर्वज्ञांना आरोगणा दिली. सर्व गोपाळांनीही सर्वज्ञांच्या सोबत भोजन केले. त्यानंतर सर्वज्ञ येथून निघून गेले. (पू.ली. ५२, स्था.पो) चारी गावच्या गोपाळांचे गाई-गुरे राखण्याचे हे सार्वजनिक ठिकाण, म्हणून याला 'गोपाळचावडी' असे म्हणतात.

जवळील इतर स्थाने