स्थान - T:नांदेड D:नांदेड
स्थान क्र. 2
गाई राखणे
नांदेड
गाई राखणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
१) नाळेश्वर ते नांदेड ११ कि.मी. २) संभाजीनगर ते नांदेड २६३ कि.मी. ३) जालना ते नांदेड १९८ कि.मी. ४) परभणी ते नांदेड ६३ कि.मी. ५) माहूर ते नांदेड १४२ कि.मी. मनमाड-हैदराबाद लोहमार्गावरील नांदेड हे रेल्वेस्थानक आहे. नांदेड बस स्थानकाजवळील सिटी बस स्टॉपवरून सिडको, हडको, एम.आय.डी.सी. तुपा इत्यादी जुना पूलमार्गे जाणाऱ्या सिटी बसने खुदवेगर स्टॉपवर उतरणे. तेथून स्थान जवळ आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जुन्या पुलाच्या पूर्वेस अंदाजे २०१ मीटर अंतरावर गोदावरी नदीच्या उत्तर काठाला लागून आहे. हे स्थान म्हणजे मोठा नमस्कारी खडक आहे. हे ठिकाण 'गोरक्षण' या नावाने प्रसिद्ध आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू ब्राह्मणाच्या गाई घेऊन येथे येत असत. ते दिवसभर या खडकावर बसत. सर्व गाई भोवताली बसून त्यांची श्रीमूर्ती अवलोकन करीत असत. सायंकाळच्या वेढेस सर्वज्ञ गाई घेऊन परत ब्राह्मणाच्या घरी जात. अशा प्रकारे १० दिवस सर्वज्ञांनी ब्राह्मणाच्या गाई राखल्या. (पू.ली. ६०, स्था.पो)