स्थान - T:नांदेड D:नांदेड
स्थान क्र. 1
लपविणे
गोपाळचावडी (सिडको)
गोपाल चोंढीए लपविणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
गोपाळचावडी (सिडको) हे ठिकाण नांदेडहून दक्षिणेस ७ कि.मी. आहे. तेथे जाण्यासाठी सिटी बस सेवा उपलब्ध आहे. तसेच नांदेड-नर्सी मार्गावरील तुपा फाट्यावरूनही गोपाळचावडीला जाता येते. तुपा फाट्यापर्यंत जाण्यासाठी नांदेडहून एस.टी. बस सेवा तथा सिटी बस सेवा उपलब्ध आहे. तसेच सिडकोपर्यंत जाण्यासाठी नांदेडहून सिटी बस सेवा उपलब्ध आहे. गोपाळचावडी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. स्थानाजवळच महानुभाव आश्रमही आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान नांदेड शहरातील गोपालचावडी या विभागात एम.आय.डी.सी. च्या दक्षिणेस उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूना एकांकामध्ये येथे विहिरीच्या काठी आसन होते. त्या वेळी गावातील गोपाल गाई, गुरे पाणी पाजण्यासाठी विहिरीवर घेऊन आले. प्रत्येक गोपाल आपली शिदोरी, काठी, घोंगडे, पावा, वाहाणा ठेवून विहिरीत पोहण्यासाठी जाई. असे सर्व गोपाल विहिरीत पोहण्यासाठी उतरले आणि अदृश्य झाले. गाई, गुरांनी पाणी पिले. गोठाणात बसल्या. तेथून रानात गेल्या. रानातून आपल्या घरी गेल्या. गावातील लोक म्हणू लागले, "गाई, गुरे आली; पण गोपाल का आले नाहीत! तरी चला, आपण त्यांचा शोध घेण्यास जाऊ या." असे म्हणून सर्वजण गोपालांचा शोध घेण्यास निघाले. संपूर्ण रानात फिरले; परंतु गोपालांचा शोध लागला नाही. मग विहिरीजवळ आले. सर्वज्ञ येथे बसलेलेच होते. या ठिकाणी गोपालांचे सर्व साहित्य पाहून त्यांनी सर्वज्ञांना विचारले, "येथे गोपाल होते का?" सर्वज्ञ म्हणाले, "होते". "कुठे आहेत ते?" लोकांनी विचारले, तेव्हा सर्वज्ञांनी विहिरीकडे बोट दाखविले. लोक म्हणाले, "तरी ते दिसत नाहीत!" सर्वज्ञ म्हणाले, "आपापल्या गोपालाचे नाव घेऊन बोलाव." मग ते सर्वजण आपापल्या गोपालाचे नाव घेऊन बोलवू लागले. त्याबरोबर एक एक गोपाल पाण्यातून वर येऊन आपापले साहित्य घेऊन निघून जाई. ते लोक त्यांना विचारत, 'तुम्ही कोठे होता?' गोपाल म्हणायचे, 'आम्ही सर्वज्ञांच्यापाशी होतो.' हा सर्व प्रकार पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. (पू.ली. ५३, स्था.पो)