स्थान - T:जालना D:जालना
स्थान क्र. 1
आसन
भाटेपुरी
आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
भाटेपुरी हे गाव, जालना-जिंतूर मार्गावरील रामनगरपासून दक्षिणेस ६ कि.मी. आहे. जालना ते रामनगर १८ कि.मी. मंठा ते रामनगर ४० कि.मी. करडगावहून वायव्येस भाटेपुरी (कार्ला , हातवण मार्गे) १२ कि.मी. आहे. भाटेपुरीला जाण्यासाठी जालन्याहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. गाढेसावरगाव ते भाटेपुरी (हिसवण मार्गे) ८ कि.मी. आहे. जालना ते भाटेपुरी (खरपुडी, खनेपुरीमार्गे) १३ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान भाटेपुरी गावाच्या पश्चिम विभागी महादेवाच्या देवळाच्या पाठीमागे कुंडलिका नदीच्या पूर्व काठावर पश्चिमाभिमुख देवळात आहे. आज हे देऊळ 'महानुभाव श्रीदत्त मंदिर' या नावाने ओळखले जाते.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात खनेपुरीहून भाटेपुरीला आले. त्यांना येथे आसन झाले. दुपारचा पूजावसर झाला. आरोगणा झाली. पहुड, उपहुड झाला. (पू.ली. ५१९ ख.प्रत, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून गाढेसावरगावला गेले.