स्थान - T:जालना D:जालना
स्थान क्र. 1
आसन
खनेपुरी
आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
भाटेपुरीहून पश्चिमेस खनेपुरी दोन कि.मी आहे. जालना ते खनेपुरी (खरपुडीमार्गे) ११ कि.मी. आहे. खनेपुरीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान खनेपुरी गावाच्या वायव्येस श्री. प्रकाश दत्तोपंत बनगे यांच्या शेताजवळ उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे काटेरी झाड होते. त्या झाडाखालील हे स्थान होय.
स्थान Images
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात कार्तिक शुद्ध तृतीयेला जालन्याहून खनेपुरीला आले. त्यांना येथे आसन झाले. येथूनच भारध्वज नावाचा पक्षी सर्वज्ञांची श्रीमूर्ती पाहून वेधला. (पू.ली. ४८५, स्था.पो) सर्वज्ञ येथून भाटेपुरीला गेले.