स्थान - T:जालना D:जालना
स्थान क्र. 1
वसती/अवस्थान
जालना
राजमठी वसती तथा अवस्थान स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
जालना हे शहर, मलकापूर-सोलापूर राज्यमार्गावर आहे. १) संभाजीनगर ते जालना ६३ कि.मी. २) सिल्लोड ते जालना ६५ कि.मी. ३) बुलढाणा ते जालना १०९ कि.मी. ४) बीड ते जालना १०३ कि.मी. ५) शहागड ते जालना ५९ कि.मी. ६) खनेपुरी ते जालना (खरपुडी मार्ग) ११ कि.मी. आहे. मनमाड-हैदराबाद लोहमार्गावरील जालना हे रेल्वेस्थानक आहे. जालना येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जालना शहरातील मस्तगद विभागात पश्चिमाभिमुख देवळात आहे. मुख्य प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख आहे. आज हे देऊळ 'श्रीदत्त मंदिर' या नावाने प्रख्यात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात दाभाडीहून जालन्याला आले. प्रथम त्यांचा येथे एक रात्र मुक्काम झाला. (पू.ली. ४५८ स्था.पो) दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वज्ञ येथून वनदेवाकडे गेले. त्यांचा ग्रामांतर करण्याचा विचार होता; पण तेथे आबाइसा व उमाइसा यांची भेट झाली. मग सर्वज्ञ म्हणाले, 'अभ्यागत आलेले आहेत, आता आम्ही ग्रामांतर करीत नाही.' मग सर्वज्ञ पुन्हा येथे आले. त्यांचे या ठिकाणी २ महिने वास्तव्य होते. (पू.ली. ४५९ स्था.पो.) येथील इतर लीळा : १) माहादाइसाच्या उपहाराचा स्वीकार करणे. (पू.ली. ४६४) २) उमाइसाच्या उपहाराचा स्वीकार करणे. (पू.ली. ४६६) ३) माहादाइसाविवादे तीकवनायका जैत. (पू.ली. ४७०) ४) भटविवादे तीकवनायका जैत. (पू.ली ४७१) ५) लखुदेवबांच्या उपहाराचा व वस्त्रांचा स्वीकार करणे. (पू.ली. ४७३) ६) परमेश्वराच्या संबंधित वस्तू वंदनीय का असतात, याविषयी भटोबासांना निरूपण करणे. (पू.ली. ४७४) ७) माहादाइसाला परिसाचे दोन दृष्टांत निरूपणे. (पू.ली. ४७७) ८) भटाकरवी क्षौर करवणे. (पू.ली. ४७९) ९) माहादाइसाच्या विनंतीवरून भक्तजनांसहित दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करणे. (पू.ली. ४८०) १०) भाऊबीजेच्या दिवशी भटोबास, माहादाइसा, हंसराज या तिघांना श्रीक्षेत्र रिद्धपूरला पाठविणे. (पू.ली. ४८१) ११) माहादाइसाच्या वस्त्राची अंगी भटोबासांना श्रीक्षेत्र रिद्धपूरला जाताना देणे. (पू.ली. ४८२) १२) एल्हाई भाऊबीज करणे. (पू.ली. ४८३) अवस्थान स्थानाच्या नैऋत्येचे स्थान निर्देशरहित आहे .