स्थान - T:जालना D:जालना
स्थान क्र. 4
पूजा/आरोगणा
जालना
पूजा आरोगणा स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
जालना हे शहर, मलकापूर-सोलापूर राज्यमार्गावर आहे. १) संभाजीनगर ते जालना ६३ कि.मी. २) सिल्लोड ते जालना ६५ कि.मी. ३) बुलढाणा ते जालना १०९ कि.मी. ४) बीड ते जालना १०३ कि.मी. ५) शहागड ते जालना ५९ कि.मी. ६) खनेपुरी ते जालना (खरपुडी मार्ग) ११ कि.मी. आहे. मनमाड-हैदराबाद लोहमार्गावरील जालना हे रेल्वेस्थानक आहे. जालना येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवळाच्या ईशान्य विभागी आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूना येथे पूजा व आरोगणा झाली. मग त्यांनी येथेच विश्रांती घेतली. सायंकाळच्या वेढेस ते येथून राजमठाकडे गेले. (पू.ली. ४५९, स्था.पो.) हिवंज कोळी आणि बळिप गौळी यांची कथा सर्वज्ञांनी येथेच सांगितली.