स्थान - T:जालना D:जालना
स्थान क्र. 5
आसन
जालना
नागविहीर, आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
जालना हे शहर, मलकापूर-सोलापूर राज्यमार्गावर आहे. १) संभाजीनगर ते जालना ६३ कि.मी. २) सिल्लोड ते जालना ६५ कि.मी. ३) बुलढाणा ते जालना १०९ कि.मी. ४) बीड ते जालना १०३ कि.मी. ५) शहागड ते जालना ५९ कि.मी. ६) खनेपुरी ते जालना (खरपुडी मार्ग) ११ कि.मी. आहे. मनमाड-हैदराबाद लोहमार्गावरील जालना हे रेल्वेस्थानक आहे. जालना येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जुन्या जालना शहरातील संजयनगरजवळ नागविहीरांच्या उत्तर काठावर आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आश्विन शुद्ध नवमीच्या दिवशी येथे विहरणाकरिता आले होते. त्या वेळी सर्वज्ञांना येथे आसन झाले. या विहिरीतून देवता आल्या. त्यांनी सर्वज्ञांच्या श्रीचरणांवर मस्तक ठेवून नमस्कार केला. डोक्याच्या केसांनी श्रीचरण झाडले. मग त्या सर्वज्ञांची आज्ञा घेऊन नगरामध्ये गेल्या. दुपारी तिकवनायकांनी उपहार आणला. पूजावसर केला. नंतर सर्वज्ञांनी आरोगणा केली. दिवस मावळेपर्यंत सर्वज्ञ येथेच होते. मग राजमठाकडे गेले. (पू.ली. ४८४, तळटीप, स्था.पो.) दोन महिन्यांच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू कार्तिक शुद्ध तृतीयेला येथून खनेपुरी ला गेले .