मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

काजळा · जालना · जालना

स्थान - T:जालना D:जालना

स्थान क्र. 1 विहरण/वसती काजळा

विहरण तथा वसती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
काजळा हे गाव, जालना-अंबड मार्गावरील काजळा फाट्यापासून पश्चिमेस ४ कि.मी. आहे. जालना ते काजळा फाटा १२ कि.मी. अंबड ते काजळा फाटा १७ कि.मी. काजळा येथे जाण्यासाठी जालन्याहून थेट एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. जालन्याहून दक्षिणेस काजळा पायमार्गे (कुंभेफळ मार्गे) ११ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान काजळा गावाच्या उत्तरेस अंदाजे ८०४ मीटर अंतरावर तळ्याच्या ईशान्य काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: जालना | Distt: जालना
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू जालन्याहून येथे विहरणासाठी आले होते. आधल्या दिवशी तिकवनायकांनी सर्वज्ञांना उपहाराची विनंती केली होती. त्यानुसार ते उपहार घेऊन जालन्याला राजमठामध्ये आले. तेव्हा त्यांना समजले की, सर्वज्ञ काजळ्याला गेलेले आहेत. मग ते उपहार घेऊन येथे आले. नंतर सर्वज्ञांना दुपारचा पूजावसर झाला. भक्तजनांसहित आरोगणा झाली. त्यानंतर त्यांनी विश्रांती घेतली. सायंकाळच्या वेढेस तिकवनायक परत गेले. सर्वज्ञांनी भक्तजनांसहित येथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते जालन्याला परत गेले. (पू.ली. ४७६, स्था.पो.)

जवळील इतर स्थाने