स्थान - T:जालना D:जालना
स्थान क्र. 1
वसती
दाभाडी
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
दाभाडी हे गाव, राजूर - फुलंब्री मार्गावर राजूहून नैऋत्येस १५ कि.मी. आहे व फुलंब्रीहून पूर्वेस ३७ कि.मी. आहे. राजूर हे गाव, जालना - सिल्लोड मार्गावर आहे व फुलंब्री हे गाव, संभाजीनगर - जळगाव मार्गावर आहे. काजळा ते दाभाडी (जालना, राजूर मार्ग) ५८ कि.मी. दाभाडीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान दाभाडी गावाच्या दक्षिणेस बाजारगल्लीजवळ लहान ओळखाच्या उत्तर काठावर उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात निल्लोडहून दाभाडीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. ४५७, स्था.पो) दुसऱ्या दिवशी ते येथून जालन्याला गेले.