स्थान - T:भोकरदन D:जालना
स्थान क्र. 1
वसती
राजूर
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
राजूर हे गाव, जालना - सिल्लोड मार्गावर जालन्याहून उत्तरेस २५ कि.मी. आहे व भोकरदनहून किंचित आग्नेयेस २६ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान राजूर गावाच्या पश्चिमेस टेकडीवर भिवंडेश्वराच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळापुढे चौकात आहे. चौक नमस्कारी आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून श्रीक्षेत्र रिद्धपूरला जाताना कडेठाणहून राजूरला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. १४२, स्था.पो) दुसऱ्या दिवशी ते येथून शेंदूरजनला गेले.