मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

आन्वा · भोकरदन · जालना

स्थान - T:भोकरदन D:जालना

स्थान क्र. 1 अवस्थान आन्वा

अवस्थान स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
आन्वा हे गाव, गोळेगाव-पारध मार्गावर गोळेगावहून किंचित आग्नेयेस ९ कि.मी. आहे व पारधहून किंचित नैऋत्येस २३ कि.मी. आहे. गोळेगाव, संभाजीनगर - जळगाव मार्गावर आहे. १) सिल्लोड ते आन्वा (गोळेगाव मार्गे) २८ कि.मी. २) अजिंठा ते आन्वा २० कि.मी. ३) भोकरदन ते आन्वा (विरेगाव, वाडी बु., वाकडी मार्गे) २४ कि.मी. आन्वा येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. भोकरदनच्या स्थानापासून उत्तरेस आन्वा (वाडी बु., वाकडी मार्गे) १६ कि.मी. आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आन्वा गावाच्या उत्तरेस अंदाजे २०१ मीटर अंतरावर देवमळ्यात उत्तराभिमुख देवळात आहे. हे देऊळ 'श्रीदत्त मंदिर' या नावाने प्रख्यात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे आंब्याचे बन होते. बनात गुढरू आंबा होता. त्या आंब्याच्या झाडाखालील हे स्थान होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: भोकरदन | Distt: जालना
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात सिल्लोडहून आन्व्याला आले. त्यांचे या ठिकाणी १५ दिवस वास्तव्य होते. (पू.ली. ४२८, स्था.पो) त्यानंतर ते येथून चारनेरला गेले. येथील इतर लीळा : १) आंबेबनाचे रक्षण करणारे बनकर दररोज सर्वज्ञांना पाचपाच आंबे अपर्ण करीत असत. (पू.ली. ४२९) २) उपाध्ये शेंदुर्णीहून श्रीक्षेत्र रिद्धपूरला श्रीप्रभूच्या दर्शनाला गेले होते. ते श्रीक्षेत्र रिद्धपूरहून आन्व्याला परत आले. येथे सर्वज्ञांची भेट झाली. सर्वज्ञांनी उपाध्यांना सर्व क्षेमवार्ता विचारली. त्यानंतर त्यांना तृप्त होईपर्यंत आंब्याचे भोजन दिले. (पू.ली. ४३०) ३) देमासाला स्वच्छतेने राहावणे. (पू.ली. ४३४)

जवळील इतर स्थाने