मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

पिंपळगाव (रेणुकाई) · भोकरदन · जालना

स्थान - T:भोकरदन D:जालना

स्थान क्र. 1 वसती पिंपळगाव (रेणुकाई)

वसती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
पिंपळगाव, विरेगाव - पारध मार्गावर विरेगावहून ईशान्येस १८ कि.मी. आहे व पारधहून नैऋत्येस ५ कि.मी. आहे. विरेगाव, भोकरदन-जाफ्राबाद मार्गावर आहे. आन्व्याहून किंचित आग्नेयेस पिंपळगाव (जळगाव, कोठाकोळी मार्ग) १२ कि.मी. आहे. पिंपळगावला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पिंपळगावच्या वायव्य विभागी बसस्थानकाजवळ उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे गद्यधराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: भोकरदन | Distt: जालना
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात मासरूळहून पिंपळगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. ४४८ ख.प्र., स्था.पो.उ.प्र.वि. स्था.पो.क्र.८९२) दुसऱ्या दिवशी ते येथून भोकरदनला गेले.

जवळील इतर स्थाने