स्थान - T:कन्नड D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 1
वसती
कन्नड
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
कन्नड हे गाव, संभाजीनगर -धुळे राज्यमार्गावर संभाजीनगरहून वायव्येस ५७ कि.मी. आहे व चाळीसगावहून आग्नेयेस ३३ कि.मी. आहे. १) धुळे ते कन्नड ९० कि.मी. २) वेरूळ ते कन्नड ३० कि.मी. ३) करंजखेड ते कन्नड २८ कि.मी. कन्नड येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान कन्नड गावाच्या दक्षिण विभागी शीतलमाता गल्लीमध्ये दक्षिणाभिमुख देवळात पूर्वाभिमुख गाभाऱ्यात आहे. मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे ब्राह्मणाचे घर होते.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात हातनूरहून कन्नडला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. ३७८, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून सायगव्हाणला गेले.