स्थान - T:कन्नड D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 1
अवस्थान
करंजखेड
अवस्थान स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
करंजखेड हे गाव, सिल्लोड-चाळीसगाव मार्गावर सिल्लोडहून किंचित वायव्येस ४२ कि.मी. आहे व चाळीसगावहून पूर्वेस ५१ कि.मी. आहे. चारनेर ते करंजखेड (घाटनांद्रा मार्ग) ३१ कि.मी. आहे . चारनेर हून नैऋत्येस करंजखेड ( लोहगाव , टाकळीअंतुर , नेवपूर मार्गे ) १६ कि.मी. आहे. हा पायमार्ग आहे. कन्नड ते करंजखेड २८ कि.मी. आहे. करंजखेडला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान करंजखेड गावाच्या पश्चिम विभागी जुन्या बाजारपेठेत उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथेच बाजारपेठ होती. या ठिकाणी पानुनायकांचे दुसरे घर होते.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात चारनेरहून करंजखेडला आले. त्यांचे या ठिकाणी दोन महिने वास्तव्य होते. (पू.ली. ४३८, स्था.पो.) दोन महिन्यांच्या वास्तव्यानंतर ते येथून निल्लोड ला गेले. येथील इतर लीळा : (१) पानुनायकांची वाताच्या दुःखातून मुक्तता करणे. (पू.ली. ४३९) (२) दादोस, भटोबास, इंद्रभट, आबाइसा, गौराइसा इत्यादी भक्तजनांनी सर्वज्ञांना पवित्रे अपर्ण करून पवित्राचे पर्व साजरे केले. (पू.ली. ४४१, ४५५) (३) घोंगडे विणण्याच्या प्रसंगावरून रामदेव उर्फ दादोस यांना जळमांडवीचा दृष्टांत निरूपणे. (पू.ली. ४४७) (४) प्रकाशदेवा गर्वा अनुवाद. (पू.ली. ४४८) (५) भटोबास आणि इंद्रभट यांना देवगिरीला पाठविणे. (पू.ली. ४५०) (६) प्रकाशदेवा निर्गमनी सीके उपहास, (पू.ली. ४५१) (७) वर्मस्पर्शे नरक होतात, याविषयी लखुबाइसांना निरूपण करणे. (पू.ली. ४५२) (८) भटोबास आणि लखुबाइसा भांडणप्रसंगी भटोबासांना रागविणे. (पू.ली. ४५३) (९) दाइबाप्रति पाटनीयां सारिखा वाटनीयां कथन. (पू.ली. ४५४) (१०) इंद्रभटांना पवित्रे देणे. (पू.ली. ४५५)