स्थान - T:कन्नड D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 3
स्पर्शणे
कन्नड
द्राक्षाचा घड स्पर्शणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
कन्नड हे गाव, संभाजीनगर -धुळे राज्यमार्गावर संभाजीनगरहून वायव्येस ५७ कि.मी. आहे व चाळीसगावहून आग्नेयेस ३३ कि.मी. आहे. १) धुळे ते कन्नड ९० कि.मी. २) वेरूळ ते कन्नड ३० कि.मी. ३) करंजखेड ते कन्नड २८ कि.मी. कन्नड येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान वसती स्थानापासून पूर्वेस २४ फूट अंतरावर पुढील सभामंडपात पूर्व भितीच्या कमानीत आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू रात्री आरोगणा ब्राह्मणाच्या अंगणामध्ये शतपावली करीत होते. अंगणात द्राक्षाचा मांडव होता. द्राक्षाचे घड लोंबत होते. शतपावली करीत असताना येथे येऊन त्यांनी द्राक्षाच्या घडाला स्पर्श केला. (पू.ली. १७५ तू.प्र.स्था.पो.)