स्थान - T:पातूर D:अकोला
स्थान क्र. 1
वसती
आलेगाव
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
घटाळीहून ईशान्येस आलेगाव पायमार्गे (नवागाव मार्गे) १० कि.मी. आहे. पातूर-बाळापूर मार्गावरील बाभूळगावपासून आलेगावला जाण्यास मार्ग आहे. १) बाभूळगाव ते आलेगाव १३ कि.मी. २) पातूर ते आलेगाव (बाभूळगावमार्ग) २२ कि.मी. ३) राजगड ते आलेगाव (नवागाव मार्ग) १८ कि.मी. आलेगावला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. एस.टी. बस स्थानकाच्या पाठीमागे श्रीकृष्ण आश्रम आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आलेगावच्या दक्षिण विभागी जुन्या वेशीजवळ (वेशीचे अस्तित्व राहिले नाही.) पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एकांकात पातूरहून आलेगावला आले. त्या वेळी त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. ८७ स्था. पो.) व पूर्वार्धात पैठणहून श्रीक्षेत्र रिद्धपूरला जाताना विश्वीहून आलेगावला आले. त्या वेळीही त्यांचे येथे एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. १४६, स्था. पो.)