स्थान - T:अकोला D:अकोला
स्थान क्र. 1
वसती
येळवण
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
घटाळीच्या स्थानापासून ईशान्येस येळवण (एरंडा मार्गे ) ६ कि.मी. आहे. अकोला ते येळवण (शिवणी, कुंभारी, विजोरा मार्गे) २० कि.मी. आहे व बोरगावमंजू, सोनाळा मार्गे २९ कि.मी. आहे. अकोला-मूर्तिजापूर मार्गावरील रंभापूरहून कानशिवणी मार्गे येळवण १५ कि.मी. आहे. घटाळीहून विजोरा अथवा कानशिवणीमार्गे येळवणला जाता येते. येळवणला जाण्यासाठी अकोला येथून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान येळवण गावाच्या नैऋत्येस एस.टी. बस थांब्याजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे. हे ठिकाण ' विघ्नेश्वर संस्थान' या नावाने ओळखले जाते. लेखकाला याच स्थानापाशी 'स्थान दर्शन' ग्रंथ लेखनाची प्रेरणा मिळाली.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
१) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूचे एकांकात येथे एक रात्र वास्तव्य होते. (स्था. पो. उ. को. द. प्र.) २) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून श्रीक्षेत्र रिद्धपूरला जाताना बार्शीटाकळीहून येथे आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. १४९, स्था. पो. को. शा. प्र.) दुसऱ्या दिवशी ते येथून लाखपुरीला गेले. देवळाच्या सभामंडपातील स्थान निर्देशरहीत आहे