मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

पातूर · पातूर · अकोला

स्थान - T:पातूर D:अकोला

स्थान क्र. 1 वसती पातूर

वसती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
पातूर हे गाव अकोला-मालेगाव मार्गावर अकोल्याहून दक्षिणेस ३२ कि.मी. आहे व मालेगावहून उत्तरेस २९ कि.मी. आहे. १) बाळापूर ते पातूर २९ कि.मी. २) आलेगाव ते पातूर (बाभूळगाव मार्ग) २२ कि.मी. आलेगावहून ईशान्येस पातूर (काला, आसोला मार्ग) ११ कि.मी. आहे हा पायमार्ग आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पातूर गावाच्या दक्षिणेस दीड कि.मी. अंतरावर बोडखा गावाकडे जाणाऱ्या बैलगाडी रस्त्याच्या पश्चिमेस पूर्वाभिमुख देवळात उत्तराभिमुख गाभाऱ्यात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: पातूर | Distt: अकोला
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एकांकात वडनेरभुजंगहून पातूरला आले. त्यांचे येथे एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. ८६, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून आलेगावला गेले. एकांतातील एक दिवसाच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथुन विश्वला गेले व पूर्वार्धातील एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून पातुरला गेले .

जवळील इतर स्थाने