स्थान - T:माहूर D:नांदेड
स्थान क्र. 2
निद्रा
माहूर
श्रीदत्तात्रेयप्रभूंचे निद्रास्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
माहूर: १) नागपूर ते माहूर (वर्धा, यवतमाळ, आणि मार्गे) २२३ कि. मी. २) नांदेड ते माहूर (तामसा, हदगाव, महागाव मार्गे) १४२ कि. मी. ३) अमरावती ते माहूर १६३ कि. मी. ४) जळगाव ते माहूर (बुलढाणा, वाशिम मार्गे) २९६ कि. मी. ५) यवतमाळ ते माहूर ७६ कि. मी. माहूरला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान माहूर गावाच्या आग्नेय विभागी उत्तराभिमुख देवळात आहे. त्रेेतायुगात या ठिकाणी देवल ऋषींचा आश्रम होता . त्यांनी लिंगाची स्थापना केली , म्हणून या ठिकाणास देव 'देवदेेवेश्वर' असे म्हणतात
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
देवल ऋषींच्या तपश्चर्येच्या सामर्थ्याने वाढत असलेले लिंग श्रीदत्तात्रेयप्रभूंनी आपला श्रीकर ठेवून खाली दाबल्यानंतर देवल ऋषी श्रीदत्तात्रेयप्रभूंना शरण आले. त्यांनी श्रीदत्तात्रेयप्रभूंची षोडशोपचारे पूजा केली. श्रीदत्तात्रेयप्रभूंनी प्रसन्न होऊन देवल ऋषींना वर मागण्यास सांगितले. तेव्हा देवल ऋषी म्हणाले, "हे जगद्गुरो ! जगदाचार्य ! भगवंत ! जोपर्यंत चंद्र, सूर्य, पृथ्वी आहे, तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी दररोज रात्री निद्रा घेण्यास यावे." श्रीदत्तात्रेयप्रभूंनी देवल ऋषींच्या विनंतीचा स्वीकार करून "तथास्तु" म्हणून वर दिला. तेव्हापासून म्हणजे त्रेेतायुगापासून श्रीदत्तात्रेयप्रभू दररोज संध्याकाळी येथे निद्रा घेण्यास येतात.