मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

माहूर · माहूर · नांदेड

स्थान - T:माहूर D:नांदेड

स्थान क्र. 4 लिंग माहूर

देवदेवेश्वर/खोलेश्वर लिंग (श्रीदत्तात्रेय संबंधित)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान श्री दत्तात्रेयप्रभूंच्या निद्रास्थान देवळाच्या पाठीमागे पूर्वाभिमुख देवळात आहे . यास 'खोलेश्वर' असेही म्हणतात.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: माहूर | Distt: नांदेड
देवल ऋषींनी नदीवर स्नान करून तीन मुठी वाळू आणून येथे महादेवाच्या लिंगाची स्थापना केली आणि आपल्या तपश्चर्येला प्रारंभ केला. त्यांच्या तपश्चर्येच्या प्रभावाने लिंग दिवसेंदिवस वाढतच चालले होते. हा सर्व प्रकार पाहून स्वर्ग, कैलास, वैकुंठातील देवी-देवता चिंताग्रस्त झाल्या. त्या सर्व देवी-देवतांनी मिळून बद्रिकाश्रमाला जाऊन श्रीदत्तात्रेयप्रभूंना विनंती केली. मग श्रीदत्तात्रेयप्रभू बद्रिकाश्रमाहून सह्याद्री पर्वतावर आले. श्रीदत्तात्रेयप्रभू लिंगाजवळ आले आणि आपला श्रीकर लिंगावर ठेवून त्याचा माथा दाबला. लिंग अतिवेगाने खाली दाबत चालले. लिंगाची अशी अवस्था पाहून देवल ऋषींचा गर्व नाहीसा झाला व त्यांनी लगेच श्रीदत्तात्रेयप्रभूंचे श्रीचरण धरले आणि विनंती केली की, "आठवण म्हणून एक हात लिंग स्मरणार्थ ठेवा." मग श्रीदत्तात्रेयप्रभूंनी एक हात लिंगावर ठेवला.

जवळील इतर स्थाने