स्थान - T:माहूर D:नांदेड
स्थान क्र. 10
वरप्रदान
माहूर
सहस्त्रार्जुन वरप्रदान स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान विंझाळा तळ्याच्या ईशान्य विभागीय आहे . हे स्थान म्हणजे मोठा खडक आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
राजा कार्तवीर्य हा थोटा होता. तो आपल्याला हात प्राप्त करून घेण्यासाठी सह्याद्री पर्वतावर आला. श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या आश्रमात राहून त्यांचे सेवादास्य करू लागला. एक दिवस श्रीदत्तात्रेयप्रभूंचे स्नान झाल्यावर त्यांचे केसकलाप वाळविण्यासाठी कार्तवीर्य धुपटणे पाहात होता. तेव्हा धुपटणे लवकर सापडेना. म्हणून त्याने आपल्या थोट्या हातावर विस्तव घेतला. त्यावर घुप घालून केसकलाप सुकवू लागला; परंतु विस्तवामुळे हाताचे कातडे जळू लागले. त्याचा घाण वास सुटला. तेव्हा श्रीदत्तात्रेयप्रभूंनी पाठीमागे वळून पाहिले व राजाला विस्तव खाली टाकण्यास सांगितले आणि म्हणाले, "मी प्रसन्न झाले आहे. तुला काय पाहिजे आहे ते माग." राजा कार्तवीर्य म्हणाला, "आपण ते जाणत आहात." मग श्रीदत्तात्रेयप्रभू म्हणाले, "सहस्रभुजा होतील, अतुलबलीया होशील, चक्रवर्तीपद प्राप्त होईल, तिन्हीही लोकांत गमन करता येईल, लोकांचे मनोरथ पूर्ण करशील; पण स्त्री, ब्राह्मण व गाय यांची हत्या करशील तर तुझा नाश होईल." असा श्रीदत्तात्रेयप्रभूंनी वर दिला. तेव्हापासून राजा कार्तवीर्यांस 'सहस्राजुर्न' हे नाव प्राप्त झाले. (उ. ली. १४५, स्था. पो.) याच तळ्याच्या काठी श्रीदत्तात्रेयप्रभूंनी गोरक्षास भेट दिली.