मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

श्री कृष्ण मंदिर अरणगाव.

अरणगाव · अहिल्यानगर · अहिल्यानगर

श्री कृष्ण मंदिर अरणगाव. - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 1 पूजा/आरोगणा अरणगाव

पूजा, आरोगणा, पहुड स्थान.

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
अरणगाव, अहिल्यानगर-दौंड मार्गावर अहिल्यानगरहून दक्षिणेस ८ कि.मी. आहे. अरणगावला जाण्यासाठी अहिल्यानगरहून एस.टी. बस सेवा व सिटी बस सेवा उपलब्ध आहे. नेप्तीहून आग्नेयेस अरणगाव (केडगाव मार्ग) ९ कि.मी. आहे. नेप्ती ते अरणगाव (अहिल्यानगर मार्ग) १४ कि.मी. आहे. अरणगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. तसेच स्थानालगतच श्रीचक्रपाणि आश्रमही आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अरणगावच्या नैऋत्येस दौंड - मनमाड लोहमार्गाच्या पश्चिमेस पूर्वाभिमुख देवळात आहे.

श्री कृष्ण मंदिर अरणगाव. Images

श्री कृष्ण मंदिर अरणगाव. Location (Google map)

श्री कृष्ण मंदिर अरणगाव. Lila

श्री कृष्ण मंदिर अरणगाव. | Taluka: अहिल्यानगर | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्थ काळात नारायणडोहहून अरणगावला आले. त्याच दिवशी या ठिकाणी दुपारचा पूजावसर झाला. आरोगणा झाली. पहुड उपहुड झाला. (उ.ली. २७६, वि. स्था. पो. १६२५)

जवळील इतर स्थाने