स्थान - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 4
विचारपूस
अरणगाव
लाहामाइसाची विचारपूस करणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
अरणगाव, अहिल्यानगर-दौंड मार्गावर अहिल्यानगरहून दक्षिणेस ८ कि.मी. आहे. अरणगावला जाण्यासाठी अहिल्यानगरहून एस.टी. बस सेवा व सिटी बस सेवा उपलब्ध आहे. नेप्तीहून आग्नेयेस अरणगाव (केडगाव मार्ग) ९ कि.मी. आहे. नेप्ती ते अरणगाव (अहिल्यानगर मार्ग) १४ कि.मी. आहे. अरणगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. तसेच स्थानालगतच श्रीचक्रपाणि आश्रमही आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मुख्य मंदिराच्या पश्चिमेस पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
साधाची आई लाहामाइसा ती आजारी होती. तिला ताप आलेला होता. तेव्हा सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूनी येथे येऊन तिची विचारपूस केली. त्या वेळी लाहामाइसा म्हणाली, 'असा ताप मला जन्मोजन्मी यावा, की ज्यामुळे सर्वज्ञ माझी नेहमी विचारपूस करतील' मग या ठिकाणी सर्वज्ञांना थोडा वेळ आसन झाले. (उ. ली. २७९, स्था. पो.)