मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

अरणगाव · अहिल्यानगर · अहिल्यानगर

स्थान - T:अहिल्यानगर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 3 आसन अरणगाव

सोंडी आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
अरणगाव, अहिल्यानगर-दौंड मार्गावर अहिल्यानगरहून दक्षिणेस ८ कि.मी. आहे. अरणगावला जाण्यासाठी अहिल्यानगरहून एस.टी. बस सेवा व सिटी बस सेवा उपलब्ध आहे. नेप्तीहून आग्नेयेस अरणगाव (केडगाव मार्ग) ९ कि.मी. आहे. नेप्ती ते अरणगाव (अहिल्यानगर मार्ग) १४ कि.मी. आहे. अरणगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. तसेच स्थानालगतच श्रीचक्रपाणि आश्रमही आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान देवळाच्या मुख्य दरवाजाच्या आत उत्तर बाजूस सभामंडपात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: अहिल्यानगर | Distt: अहिल्यानगर
१) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू नारायणडोहहून आल्यावर प्रथम त्यांना येथे आसन झाले. त्या वेळी द्रविळासबाइसा, आपले अंग घामाने भरले म्हणून समोरून वाहत असलेल्या ओढ्यावर हात पाय धुण्याकरिता गेल्या. बाह्या मागे सारून हात काखेपासून उघडे करून धुऊ लागल्या . त्यामुळे बाइसा त्यांना रागावल्या . सर्वज्ञांनीही हा प्रकार पाहिला . हात पाय धुतल्यावर द्रविळासबाइसा सर्वज्ञांकडे आल्या . तेव्हा सर्वज्ञांनी त्यांना शिक्षापण केले आणि सांगितले , " लज्जारूप धर्म स्त्रियांच्या शीलाचे रक्षण करणारा आहे . म्हणून तुम्ही लज्जेनेच वागले पाहिजे . " (उ. ली. २७६, स्था. पो.) २) ज्या वेळी गुरवाचे आसुचे नारळ चोरीस गेले, त्या प्रसंगी साधा गुरवाला अपशब्द बोलली. तेव्हा सर्वज्ञांनी साधाला येथेच शिक्षापण केले. (उ. ली. २७७)

जवळील इतर स्थाने