स्थान - T:नांदेड D:नांदेड
स्थान क्र. 1
आसन/स्थिती देणे
नाळेश्वर
आसन तथा संन्याशास्त्र स्थिती देणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
नाळेश्वर हे गाव, नांदेडहून ११ कि.मी. आहे. नाळेश्वर ते नाळेश्वरचे स्थान २ कि.मी. लिंबगाव ते नाळेश्वरचे स्थान ३ कि.मी. नाळेश्वरच्या स्थानापाशी तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. नाळेश्वरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान गोपाळचावडीपासून आग्नेयेस २ कि.मी. अंतरावर नाळेश्वर गावाच्या हद्दीत लिंबगाव ते नाळेश्वर सडकेच्या दक्षिणेस अंदाजे २०१ मीटर अंतरावर उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूच्यापासून मिळालेल्या सुखानंदाविषयी गोपाळ एकमेकांमध्ये संवाद करीत होते. त्या वेळी एक संन्यासी त्या मार्गाने जात होता. त्याने गोपाळांचा संवाद ऐकला आणि आश्चर्यचकित होऊन म्हणू लागला, 'ही गाई-गुरे राखणारी मुले, यांना सुख आणि आनंद काय माहीत! हा शब्द विद्वान लोकांचा आहे! हा शब्द ही गुराखी मुले कसा काय जाणतात!' म्हणून जिज्ञासापूर्वक त्या संन्याशाने मुलांना विचारले, मग गोपाळांनी घडलेली सर्व हकीकत सांगितली. संन्याशाने विचारले, 'ते देव कुणीकडे गेले?' गोपाळ म्हणाले, 'याच मार्गाने गेले.' लगेच तो संन्यासी येथे आला. त्या वेळी सर्वज्ञ येथे झाडाखाली बसले होते. त्याला सर्वज्ञांचे दर्शन झाले व सर्वज्ञांच्यापासून स्थिती झाली. (पूर्वार्ध लीळा ५२, स्थान पोथी)