मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

राहेर · नायगाव · नांदेड

स्थान - T:नायगाव D:नांदेड

स्थान क्र. 1 आसन राहेर

आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
राहेर हे गाव, नर्सी-लोहगाव-उमरी मार्गावर लोहगावहून उत्तरेस १५ कि.मी. आहे व उमरीहून दक्षिणेस १७ कि.मी. आहे. १) नांदेड ते राहेर (नर्सी मार्गे) ६७ कि.मी. २) नर्सी ते राहेर २० कि.मी. ३) भोकर ते राहेर ४० कि.मी. नर्सी हे गाव, नांदेड-देगलूर मार्गावर नांदेडहून आग्नेयेस ४७ कि.मी. आहे. लोहगाव, नर्सी-निजामाबाद मार्गावर नर्सीहून पूर्वेस ५ कि.मी. आहे. राहेरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जुन्या राहेर गावाच्या पूर्वेस गावालगतच गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर उत्तराभिमुख देवळात आहे. मुख्य प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पिंपळाचे झाड होते. त्या झाडाखालील हे स्थान होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: नायगाव | Distt: नांदेड
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे एकांकामध्ये राहेरला वास्तव्य असताना ते वामनपेंधी ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला जात होते. वामनपेंधीची पत्नी येल्हासा रोज सर्वज्ञांना भिक्षा वाढत असे. एक दिवशी काही कारणामुळे येल्हासा मरण पावली. तिला अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आणले. त्या वेळी सर्वज्ञ स्मशानभूमी शेजारील पिंपळाच्या झाडाखाली बसले होते. वामनपेंधीने सर्वज्ञांना पाहिले. जवळ येऊन दंडवत केला आणि 'माझी पत्नी मरण पावली. आता आम्हाला भिक्षा कोण वाढेल?' म्हणून दुःख करू लागले. (पू.ली. ६४, स्था.पो.)

जवळील इतर स्थाने