मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रहाटगाव · पैठण · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 1 वसती रहाटगाव

वसती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
रहाटगाव, पैठण-पाचोड मार्गावरील रहाटगाव फाट्यापासून उत्तरेस १ कि.मी. आहे. १) पैठण ते रहाटगाव फाटा १० कि.मी. २) पाचोड ते रहाटगाव फाटा २१ कि.मी. रहाटगावला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान रहाटगावच्या वायव्य विभागी महादेवाच्या देवळालगत दक्षिण बाजूस पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे महालक्ष्मीचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: पैठण | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात श्रीक्षेत्र रिद्धपूरला जाताना पैठणहून रहाटगावला आले. येथे दुपारचा पूजावसर आरोगणा झाली. सायंकाळचा पूजावसर झाला आणि येथेच एक रात्र मुक्काम झाला. पैठणहून श्रीक्षेत्र रिद्धपूरला जाताना सर्वज्ञांच्या सोबत बाइसा, हंसराज आणि चांगदेवभट होते. (पू.ली. १४०, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वज्ञ येथून कडेठाणला गेले.

जवळील इतर स्थाने