मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

कडेठाण बु · पैठण · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:पैठण D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 1 वसती कडेठाण बु

वसती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
पैठणहून ईशान्येस कडेठाण (ढोरकीन, बालनगर मार्ग) ४० कि.मी. आहे. संभाजीनगर , अडूळ ,राजपूर मार्ग कडेठाणला जाता येते. तसेच पैठण-पाचोड मार्गावरील हर्षी फाट्यावर उतरून कडेठाणला पायी जाता येते. हर्षी फाट्याहून उत्तरेस कडेठाण (हर्षी, रांजणगाव मार्ग) ७ कि.मी. आहे. कडेठाणला जाण्यासाठी पैठण, पाचोड व संभाजीनगरयेथून एस.टी. बस सेवा व इतर वाहन सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान कडेठाण गावाच्या वायव्य विभागी महालक्ष्मीच्या पूर्वाभिमुख देवळापुढे चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. नमस्कारी चौकाभोवती आडासारखी गोल २ फूट उंचीची भिंत बांधली आहे. उत्तर बाजूने नमस्कार करण्यास जागा आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: पैठण | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून श्रीक्षेत्र रिद्धपूरला जाताना रहाटगावहून कडेठाणला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. १४१, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी सकाळी ते येथून राजूरला गेले.

जवळील इतर स्थाने