स्थान - T:गंगापूर D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 1
वसती
फुलशिवरा
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
फुलशिवरा हे गाव, लासुर स्टेशन ते गाजगाव (गवळीशिवरामार्ग) मार्गावर आहे. १) लासुर स्टेशन ते फुलशिवरा ८ कि.मी. २) गाजगाव ते फुलशिवरा ३ कि.मी. मनमाड-हैदराबाद लोहमार्गावरील पोटूळ रेल्वे स्थानकावर अथवा लासू रेल्वे स्थानकावर उतरून फुलशिवरा जाता येते. फुलशिवरा हे गाव, पोटूळ रेल्वे स्थानकाहून नैऋत्येस (रांजणगाव पोळ मार्ग) ७ कि.मी. आहे. संभाजीनगर व रोटेगावमधील ही दोन रेल्वेस्थानके होत.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान फुलशिवरा गावाच्या पूर्वेस अंदाजे २०१ मीटर अंतरावर प्रतापपूर वाडी मार्गावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे फुलेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.
स्थान Images
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात गंगापूरहून फुलशिवर्याला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. ३७३ स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून वेरूळला गेले.