स्थान - T:वैजापूर D:छत्रपती संभाजीनगर
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
लासूर हे गाव गंगापूर-कन्नड मार्गावरील लासूर रेल्वेस्थानकापासून वायव्येस ३ कि.मी. आहे. त्याचप्रमाणे मुंबई-नागपूर महामार्गावरील वैजापूरहून पूर्वेस २८ कि.मी. आहे. फुलशिवर्याहून वायव्येस लासूर (गवळीशिवरा, लासूर रेल्वेस्थानक मार्ग) ११ कि.मी. आहे. मनमाड-हैदराबाद लोहमार्गावरील संभाजीनगर व रोटेगावमधील लासूर हे रेल्वेस्थानक आहे. लासूरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान लासूर गावाच्या दक्षिणेस अंदाजे ८०४ मीटर अंतरावर मुंबईनागपूर महामार्गाच्या दक्षिणेस शिवना नदीच्या पश्चिम काठावर पुलाजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे जोगेश्वरीचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय. आज हे देऊळ 'श्रीदत्त मंदिर' या नावाने प्रख्यात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.