स्थान - T:कन्नड D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 1
वसती
विटखेडा
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
विटखेडा हे गाव, देवगाव (रंगारी)- गल्लीबोरगाव मार्गावरील विटखेडा फाट्यापासून ४ कि.मी. आहे. देवगाव ते विटखेडा फाटा ३ कि.मी. आहे व गल्लीबोरगाव ते विटखेडा फाटा ९ कि.मी. आहे. विटखेडा वेरूळहून पश्चिमेस ९ कि.मी. आहे. देवगाव, गंगापूर-कन्नड मार्गावर आहे व गल्लीबोरगाव, संभाजीनगर-धुळे मार्गावर आहे. लासूरहून देवगाव (लासूर स्टेशन मार्गे) १४ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान विटखेडा गावाच्या पूर्व विभागी दक्षिणाभिमुख देवळात आहे. देवळात प्रवेश केल्यावर आपणास दोन ओटे दिसतील, त्यापैकी पश्चिम बाजूचे वसती स्थान होय.
स्थान Images
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात माटेगावहून विटखेड्याला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. २२९, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून लासूरला गेले. वस्ती स्थानाच्या पूर्वेचे ४ फूट १० इंंच अंतरावरील स्थान निर्देशरहित आहे