मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

माटेगाव · कन्नड · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:कन्नड D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 1 आसन माटेगाव

आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
माटेगाव, विटखेडा-वेरूळ मार्गावरील माटेगाव फाट्यापासून २ कि.मी. आहे. वेरूळ ते माटेगाव फाटा ५ कि.मी. विटखेडा ते माटेगाव फाटा २ कि.मी. विटखेड्याहून किंचित ईशान्येस माटेगाव पायमार्गे (मार्गे चांभारवाडी) २ कि.मी. आहे. माटेगावहून वेरूळलाही जाता येते.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान माटेगावच्या पूर्वेस गावालगतच येळगंगा नदीच्या उत्तर काठावर रस्त्याच्या कडेला पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे वडाचे झाड होते. त्या झाडाखालील हे स्थान होय.

स्थान Images

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: कन्नड | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे पूर्वार्धात वेरूळ येथे वास्तव्य असताना देवगिरीचा राजा महादेवराय, त्यांच्या दर्शनाला येणार होता; परंतु तो दर्शनाला अपात्र असल्यामुळे सर्वज्ञांनी वेरूळहून प्रयाण केले आणि ते माटेगावला आले. त्यांना येथे आसन झाले. (पू.ली. २२७, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून विटखेड्याला गेले.

जवळील इतर स्थाने