स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 4
अवस्थान
वेरूळ
अवस्थान स्थान (लेणे क्र. १२ - थोरला राजविहार)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
राजविहार लेणे तीन मजली असून पश्चिमाभिमुख आहे. तिसऱ्या मजल्यावर अवस्थान स्थान आहे. पहिल्या मजल्याहून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पहिल्या मजल्याच्या प्रारंभीच्या पटीशाळेच्या दक्षिण बाजूने जिना आहे. दुसऱ्या मजल्याहून तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दुसऱ्या मजल्याच्या प्रारंभीच्या पटीशाळेच्या उत्तर बाजूने जिना आहे. तिसऱ्या मजल्यावर प्रवेश करताच समोरच पाषाणावर कोरलेला उत्तरदक्षिण ओटा आहे. तेच अवस्थान स्थान होय.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पूर्वार्धात पहिल्या वेढेस गदान्याहून वेरूळला आले. त्या वेळी त्यांचे येथे तीन दिवस वास्तव्य होते. त्यांना या ओट्यावर आसन, श्रीचरण-प्रक्षाळण, गुळळा (चूळ भरणे ), विडा, पहुड, उपहुड होत असे व तिन्हीही पूजावसर याच ओट्यावर होत असत. (पू.ली. १७९, स्था.पो.) (२) घोर शब्द श्रवण, (पू.ली. १८०)