स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 15
विहरण
वेरूळ
विहरण स्थान (लेणे क्र. १६ - माणिकेश्वर सभामंडप)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
लेण्यात मध्यभागी असलेल्या माणिकेश्वराच्या पश्चिमाभिमुख देवळाच्या सभामंडपाच्या चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे. माणिकेश्वराकडे जाण्यासाठी उत्तर व दक्षिण बाजूने जिना आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू कैलास लेण्यात विहरणासाठी आल्यावर माणिकेश्वराच्या सभामंडपाच्या चौकात त्यांना आसन होत असते. सर्वज्ञ येथे भक्तजनांना परावर शास्त्राचे निरूपण करीत असत. (पू.ली. १८७, २१४, २१६ स्था.पो.)