स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 17
कथन
वेरूळ
पेखणीका चोरी कथन स्थान (लेणे क्र. १६)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
माणिकेश्वराच्या दक्षिणेस तीन मजली उत्तराभिमुख लेणे आहे. दुसऱ्या मजल्यावरील लेण्यात हे स्थान आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
एके दिवशी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू कैलास लेण्यात विहरणासाठी आले. माणिकेश्वराच्या चौकात त्यांना थोडा वेळ आसन झाले. नंतर ते दुसऱ्या मजल्यावरील लेण्यात आले. भुयाराच्या दारापाशी चरणचारी उभे राहून सर्वज्ञ म्हणाले, "या लेण्याच्या चौकात नृत्य होत होते. त्या वेळी चोरांनी येऊन नृत्य करणाऱ्या स्त्रियांचे या भुयारातून अपहरण केले." असे म्हणून त्यांनी भुयाराची जागा भक्तजनांना दाखविली. (पू.ली. २०२ ख.प्र.स्था.पो.वि.स्था.पो.८९२)