मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

मांडवगण · श्रीगोंदा · अहिल्यानगर

स्थान - T:श्रीगोंदा D:अहिल्यानगर

स्थान क्र. 1 वस्ती स्थान मांडवगण

वस्ती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
मांडवगण हे गाव, अहिल्यानगर-सोलापूर मार्गावरील मांडवगण फाट्यापासून नैऋत्येस ४ कि.मी. आहे. अहिल्यानगर ते मांडवगण फाटा ३२ कि.मी. व घोगरगाव ते मांडवगण फाटा ४ कि.मी. आहे. श्रीगोंदा ते मांडवगण ३० कि.मी. आहे. मढपिंपरीहून मांडवगण (रुईछत्तीसी मार्ग) १३ कि.मी. आहे. मढपिंपरीहून मांडवगण पायमार्ग ९ कि.मी. आहे. मांडवगणला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मांडवगण गावाच्या उत्तरेस गावालगतच, नदीच्या उत्तर काठावर सिद्धनाथ देवळाच्या आवाराच्या पूर्वेस माळावर पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: श्रीगोंदा | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात घोगरगावहून मांडवगणला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (स्था. पो.) त्यानंतर ते येथून अरणगावला गेले. देवळाच्या ईशान्येच्या ओट्यावरील स्थान निर्देशराहित आहे.

जवळील इतर स्थाने