मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

मांडवगण · श्रीगोंदा · अहिल्यानगर

स्थान - T:श्रीगोंदा D:अहिल्यानगर

स्थान क्र. 2 चिंचा भाजविणे मांडवगण

चिंचा भाजविणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
मांडवगण हे गाव, अहिल्यानगर-सोलापूर मार्गावरील मांडवगण फाट्यापासून नैऋत्येस ४ कि.मी. आहे. अहिल्यानगर ते मांडवगण फाटा ३२ कि.मी. व घोगरगाव ते मांडवगण फाटा ४ कि.मी. आहे. श्रीगोंदा ते मांडवगण ३० कि.मी. आहे. मढपिंपरीहून मांडवगण (रुईछत्तीसी मार्ग) १३ कि.मी. आहे. मढपिंपरीहून मांडवगण पायमार्ग ९ कि.मी. आहे. मांडवगणला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान सिद्धनाथ देवळाच्या पूर्वेस आवाराच्या आग्नेय कोपऱ्याच्या बाहेरील बाजूस नदीच्या उत्तर काठावर चिंचेच्या झाडाखाली पूर्वाभिमुख देवळात आहे. हे स्थान उत्तरार्धातील आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: श्रीगोंदा | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूना दुपारचा पूजावसर झाला. आरोगणा झाली. पहुड झाला. मग भक्तजन जेवले. जेवण झाल्यावर येथे आले आणि त्यांनी चिंचा तोडून खाण्यास सुखावत केली. उपहुड झाल्यावर सर्वज्ञ येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. सर्वज्ञ भक्तजनांना म्हणाले, "अशा कच्च्या चिंचा खाऊ नका. आंबट लागतील, भाजून खा." मग भक्तजनांनी विस्तव आणला आणि चिंचा भाजून खाल्ल्या. (उ.ली. २७३, स्था.पो.उ.प्रत)

जवळील इतर स्थाने