स्थान - T:श्रीगोंदा D:अहिल्यानगर
स्थान क्र. 3
अवस्थान
मांडवगण
अवस्थान स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
मांडवगण हे गाव, अहिल्यानगर-सोलापूर मार्गावरील मांडवगण फाट्यापासून नैऋत्येस ४ कि.मी. आहे. अहिल्यानगर ते मांडवगण फाटा ३२ कि.मी. व घोगरगाव ते मांडवगण फाटा ४ कि.मी. आहे. श्रीगोंदा ते मांडवगण ३० कि.मी. आहे. मढपिंपरीहून मांडवगण (रुईछत्तीसी मार्ग) १३ कि.मी. आहे. मढपिंपरीहून मांडवगण पायमार्ग ९ कि.मी. आहे. मांडवगणला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान सिद्धनाथाच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. देवळाला दोन सभामंडप आहेत. दुसरा सभामंडप प्राचीन आहे. त्या सभामंडपात उजव्या डाव्या हाताच्या चौकात दोन खांबांमध्ये हे स्थान आहे. स्थानाचा ओटा नाही.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात घोगरगावहून मांडवगणला आले . त्यांचे या ठिकाणी तीन दिवस वास्तव होते . ( उ.ली. २७३, तु. प्र. स्था. पो ) तीन दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून नारायणडोहला गेले . सर्वज्ञांनी येथूनच नाथोबांना , साधाला घेऊन येण्यासाठी चिचोंडीला पाठवले . ( उ. ली. २७४ )