स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 46
भेटी/नामकरण
वेरूळ
संतोषा भेटी, नामकरण स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
अनेकैएच्या लेण्याजवळ दुसरे एक दक्षिणाभिमुख लिंगाचे लेणे आहे. त्या लेण्याच्या दारसंका व दरवाजातील जागा नमस्कारी आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
एक दिवशी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू अनेकैएच्या लेण्याकडे विहरणासाठी आले. दक्षिणाभिमुख लिंगाच्या लेण्यात एक अज्ञात महात्मा बसले होते. सर्वज्ञांनी लेण्याच्या दोन्ही दारसंका धरून त्यांना विचारले. "महात्मा: आपण येथे असिजे?" तेही म्हणाले "असो सुखे संतोषे" "ए नगरीची भिक्षा कीजे?" "कीजे सुखेसंतोषे:" "एथ जेविजे?" "जेवूं सुखेसंतोषे:" "एथ निद्रा करा?" "करूं सुखेसंतोषे" यावरून सर्वज्ञांनी त्यांचे संतोष असे नाव ठेवले आणि त्यांना सर्वज्ञांच्यापासून स्थिती झाली. तेव्हापासून ते सर्वज्ञांच्या साहित्यातच राहू लागले. (पू.ली. २०५, वे.स्था.पो.वि.स्था.पो.क्र.८९२)