मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

घोगरगाव · श्रीगोंदा · अहिल्यानगर

स्थान - T:श्रीगोंदा D:अहिल्यानगर

स्थान क्र. 1 वस्ती घोगरगाव

वस्ती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
घोगरगाव हे गाव, अहिल्यानगर-सोलापूर मार्गावर अहिल्यानगरहून ३६ कि.मी. आहे. मांडवगण ते घोगरगाव ११ कि.मी. आहे. मांडवगणहून घोगरगाव (खिंडकेवाडी मार्ग) ७ कि.मी. आहे. हा पायमार्ग होय. मांडवगणहून घोगरगावला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. घोगरगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान घोगरगावच्या पूर्वेस गावालगतच ओढ्याच्या पलीकडे अहिल्यानगर - सोलापूर मार्गाच्या उत्तर बाजूस पूर्वाभिमुख देवळात आहे. देवळाच्या सभामंडपाला पूर्वाभिमुख, उत्तराभिमुख, दक्षिणाभिमुख तीन दारे आहेत. मुख्य प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: श्रीगोंदा | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात एकदा व उत्तरार्ध काळात एकदा असे एकूण दोन वेळा घोगरगावला आले. दोन्हीही वेळेस ते मिरजगावहून घोगरगावला आले. दोन्हीही वेळेस त्यांचे येथे एक-एक रात्र वास्तव्य होते. दोन्हीही वेळेस ते येथून मांडवगणला गेले. (पू.ली. ३५१, उ.ली. २७२, स्था.पो.)

जवळील इतर स्थाने