मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

मिरजगाव · कर्जत · अहिल्यानगर

स्थान - T:कर्जत D:अहिल्यानगर

स्थान क्र. 1 वस्ती स्थान मिरजगाव

वस्ती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
मिरजगाव, अहिल्यानगर-सोलापूर मार्गावर अहिल्यानगरपासून ५२ कि.मी. आहे. घोगरगावहून आग्नेयेस मिरजगाव १६ कि.मी. आहे. मिरजगावला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मिरजगावच्या नैऋत्येस रवळगाव वेशीपासून अंदाजे २०१ मीटर मिरजगाव - बिटकेवाडी - श्रीगोंदा मार्गावर तीर्थाच्या मळ्यात पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: कर्जत | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात वाकीहून मिरजगावला आले. त्या वेळी त्यांचे येथे एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. ३५०, स्था. पो.) व उत्तरार्धातही वाकीहूनच मिरजगावला आले. त्या वेळी त्यांचे या ठिकाणी एक रात्रच वास्तव्य होते. (उ.ली. २७२, स्था. पो.) सायंकाळचा व दुसऱ्या दिवशी सकाळचा असे दोन्हीही पूजावसर येथे झाले. (उ.ली. २८८, ग. प्रत) दोन्हीही वेळेस सर्वज्ञ येथून घोगरगावला गेले. वसती स्थानाच्या ईशान्येचे ४ फूट १० इंच अंतरावरील स्थान निर्देशरहित आहे

जवळील इतर स्थाने