स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 1
वसती
गदाना
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
गदाना हे गाव, खुलताबाद-फुलंब्री मार्गावर खुलताबादहून ईशान्येस ९ कि.मी. आहे व फुलंब्रीहून नैऋत्येस १७ कि.मी. आहे. वेरूळ लेणी ते गदाना १२ कि.मी. गदाना येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. शाळेच्या पाठीमागे महानुभाव आश्रम आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान गदाना गावाच्या वायव्येस डोंगरावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे वनदेवाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.
स्थान Images
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात फुलंब्रीहून गदान्याला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. १७८, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून वेरूळला गेले . वस्तीस्थानाच्या ईशान्येचे स्थान त्या लगतचे स्थान व देवळाबाहेरील उत्तर बाजूचे पूर्वभिमुख देवळातील स्थान ही तिन्ही स्थानी निर्देशरहित आहेत