स्थान - T:खुलताबाद D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 1
वसती
फुलंब्री
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
फुलंब्री हे गाव, जळगाव-संभाजीनगरमार्गावर संभाजीनगरहून किंचित ईशान्येस २५ कि.मी. आहे व सिल्लोडहून नैऋत्येस ३५ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान फुलंब्री गावाच्या मध्यभागी कथार गल्लीत पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात राजूरहून फुलंब्रीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. सर्वज्ञांच्या वेळी येथे मठ होता. तो कोणी बांधला याची कथा सर्वज्ञांनी भक्तजनांना सांगितली. (पू.ली. १७७, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून गदान्याला गेले.