स्थान - T:सिल्लोड D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 1
वसती
निल्लोड
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
निल्लोड हे गाव, संभाजीनगर-जळगाव मार्गावरील निल्लोड फाट्यापासून पूर्वेस २ कि.मी. आहे. १) सिल्लोड ते निल्लोड फाटा १० कि.मी. २) फुलंब्री ते निल्लोड फाटा २५ कि.मी. निल्लोडला जाण्यासाठी सिल्लोडहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान निल्लोड गावापासून पूर्वेस एक कि.मी. अंतरावर बोरगाव रस्त्यावर नदीच्या दक्षिण काठी पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात करंजखेडहून निल्लोड आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. ४५६, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून दाभाडीला गेले.